
MES Ayurved Mahavidyalay, Lote – Ghanekhunt (Chiplun)
Mumbai-Goa Highway, Opp. Lote MIDC, Ghanekhunt, Tal - Khed, Dist - Ratnagiri - 415722
Established 2010
शैक्षणिक क्षेत्रात सुमारे १५० वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने वर्ष २००७-०८ मध्ये ‘एम.इ.एस. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस’च्या रुपात आरोग्य सेवा क्षेत्रात पदार्पण केलं. सेवा, शिक्षण आणि संशोधन ही त्रिसूत्री केंद्रस्थानी मानून एम.इ.एस.ए.एम. परशुराम रुग्णालय व संशोधन केंद्र या नावाने दिनांक १२/१२/२००७ रोजी एम.ई.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर चे उद्घाटन झाले.
• रत्नागिरी जिल्ह्यात १०० बेड्स, तीन सुसज्ज OPARATION THEATERS, ICU व NICU ची सोय असलेले सुसज्ज असे हे एकमेव ‘आयुष’ रुग्णालय आहे.
• येथे आवश्यकतेनुसार आयुर्वेदिक तसेच आधुनिक औषधोपचार केले जातात.
• आत्यायिक विभागात २४ तास आपत्कालीन रुग्ण सेवा उपलब्ध असते.
• शासनमान्य MTP , TL, Dots Centre आहे.
१ कायचिकित्सा ( Medicine )
२ पंचकर्म
३ शल्य ( Surgery ) –शालाक्य (ENT & Ophthalmic )
४ दंतरोग
५ बालरोग ( Pediatric )
६ स्त्रीरोग ( Gynaec & Obs )
७ स्वस्थवृत्त आणि योग
८ Physiotherapy इ. विभागांत रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येतात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी योजना
आर्थिकदृष्ट्या गरीब (ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु.८५००० पेक्षा कमी आहे ) व दुर्बल (ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. १,६०,००० पेक्षा जास्त नाही) अशा रुग्णांसाठी एकूण २० खाटा आरक्षित आहेत. त्यांना मोफत/ सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देण्यात येते.
१. कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्र (सी टी सी) –
खेड तालुक्यातील ग्रेड ०२,०३, व ०४ या कुपोषित मुलांना
रुग्णालयात आणून बालरोगतज्ञांच्या देखरेखीखाली त्यांना पोषक आहार दिला जातो. त्यांच्या वजनवाढीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते. आरोग्य या विषयावर या मुलांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. परशुराम रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या मुलांवर आधुनिक वैद्यकीय उपचारांना आयुर्वेदिक उपचाराची जोड दिली जाते. मुलांवर मोफत उपचार व पोषक आहारासाठी होणारा सर्व खर्च परशुराम रुग्णालय करते.
२. अंधत्व निर्मूलन कार्यक्रम -
परशुराम रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातर्फे खेड तालुका व पंचक्रोशीमध्ये
नेत्ररोग तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. छोट्या शस्त्रक्रियांपासून बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांपर्यंत सर्व शस्त्रक्रिया इतर खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत अतिशय कमी दरात केल्या जातात. लायन्स NAB नेत्र रुग्णालय, मिरज यांचे सहकार्याने परशुराम रुग्णालयात मोतीबिंदू रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येतात.
३. मुक्ती मधुमेहापासून -
दर सोमवारी मधुमेही रुग्णांची रक्तातील साखरेची तपासणी मोफत करण्यात
येते. त्यांना आयुर्वेदिक औषधे देऊन आहार व दैनंदिन व्यायामासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. त्यायोगे त्यांचे औषधांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
४. 40plus तपासणी -
वयाच्या चाळीशीनंतर हळूहळू होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मधुमेह, रक्तदाब,
संधिवात, यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन चाळीस वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी माफक दरात रुग्ण तपासणी, रक्त, लघवी, इ. सी. जी., एक्स-रे, या तपासण्या केल्या जातात.
५. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन –
परिसरातील माध्यमिक शाळांमध्ये रुग्णालयातर्फे विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येते.
६. पंचकर्म शिबीर –
आयुर्वेदिक पध्दतीने औषधोपचार तसेच पंचकर्म चिकित्सा प्रचार व प्रसिद्धी याकरिता रुग्णालयातर्फे शिबिरे राबविली जातात. पंचकर्म विषयातील तज्ञ डॉक्टर्स व सहकारी गावोगावी जाऊन रुग्णांवर स्नेहन- स्वेदनादी पंचकर्मे करतात.
७. रक्तदान शिबीर :-
सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र लोटेमाळ, बी.के.एल.वालावलकर हॉस्पिटल,डेरवण व एम.इ.एस.ए.एम.परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.




