MES School Of Nursing, Lote - Ghanekhunt (Chiplun)

Mumbai-Goa Highway, Opp. Lote MIDC, Ghanekhunt, Tal - Khed, Dist - Ratnagiri - 415722
Established in 2009

एम ई एस कॉलेज ऑफ नर्सिंग हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एक नामांकित नर्सिंग शिक्षण संस्थान असून रत्नागिरी जिल्ह्यातील घाणेखुंट-लोटे, ता. खेड येथे स्थित आहे. महाविद्यालयाची स्थापना २७ जुलै २००९ रोजी झाली असून ते Maharashtra University of Health Sciences (MUHS), Nashik संलग्न आहे. तसेच Indian Nursing Council (INC), Maharashtra Nursing Council (MNC) व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे.

महाविद्यालयात ANM, GNM, B.Sc. Nursing, Post Basic B.Sc. Nursing आणि M.Sc. Nursing हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वार्षिक १६५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेल्या या संस्थेतून आजपर्यंत १२०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते भारत तसेच परदेशातील नामांकित आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत.

१३.५ एकर परिसरात वसलेले हे महाविद्यालय अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, संगणक विभाग, वसतिगृह, क्रीडा सुविधा व उत्कृष्ट क्लिनिकल प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते. NAAC कडून “B+” मानांकन प्राप्त असलेले हे महाविद्यालय गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण, सेवा व संशोधनासाठी ओळखले जाते.