Contribution

विनम्र आवाहन

इसवीसन १८६० पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली,विद्यार्थ्यांना आधुनिक विद्या प्रदान करण्याचा, त्यांना सर्वांगाने सक्षम करण्याचा वसा अखंडपणे जपत असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी! संस्थेचा हा तब्बल १६० वर्षांचा प्रवास मएसोच्या भव्य परिवारातील मंडळींच्या सहकार्याने, सहयोगाने समृद्ध ठरला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी; अर्थात मएसो, आपली परंपरा जपत येथूनपुढेही शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. आजही संस्था अनेक नवनवीन प्रकल्प, विद्यार्थ्यांना उपयोगी असे उपक्रम,सातत्याने आखत आहे.उत्तमोत्तम अशा भौतिक सोयी-सुविधा, अद्ययावत यंत्रणा वापरात आणू पाहत आहे. भविष्यात सुजाण, सुशिक्षित व आदर्श असे नागरिक घडावेत, त्यांनीही समाजाचा एक घटक म्हणून भविष्यात उत्तम कार्य करावे हीच सद्भावना त्यामागे आहे.

या पवित्र व समाजोपयोगी कार्यात आपणही सहभागी व्हावे असे आम्ही आपणास विनम्र आवाहन करत आहोत. शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या या टप्प्यावर आपणही यथाशक्यनिधी देऊन मदत स्वरुपात अथवा आपला अमूल्य वेळ संस्थेस देऊन, मार्गदर्शन स्वरुपात सहयोग देऊ शकता, संस्थेशी जोडले जाऊ शकता.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षांत शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उपक्रम, कार्यक्रम नियोजित आहेत. त्याचे अगत्याचे निमंत्रण आपणास योग्य वेळी पोहोचेलच! आपण त्यात स्नेहभावाने सहभागी व्हाल याची आम्हास खात्री आहे.

लवकरच भेटू!
कळावे.

Donation in Indian Rupee

Click Here To Donate

Donation in Foreign Currency

Click Here To Donate