Samaj Bhushan Award to MES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला प्रदान

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१५-१६ वर्षासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. १८ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे व संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी संस्थेच्या वतीने तो स्वीकारला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जोपासत असलेल्या सामाजिकतेच्या भानाला शासनानं दिलेली ही पावती संस्थेच्या वाटचालीतला मैलाचा दगड ठरला आहे.