MES Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalay, Panvel (High School)
Plot No. 113, Sector 06, New Panvel 410 206
Established in 1999
Medium – Marathi
- प्रतिवर्षी म.ए.सो. प्रशस्तिपत्रकाने सन्मानित
- आनंददायी व कृतियुक्त उपक्रम
- इंद्रधनू व बालोद्यान उपक्रम
- बालगटापासून वाणी संस्कारासाठी संस्कृत भाषेचा परिचय
- क्षेत्रभेटी व व्यक्तिमत्व विकास शिबीर
- ‘संवाद’ पाक्षिक व ‘मुक्तांगण’ या दोन अंकांचे प्रकाशन
- इ. १० वी चा सातत्यपूर्ण १००% निकाल
- स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन
- विद्यार्थी समुपदेशन कक्ष
- क्रीडावर्धिनी – देशीविदेशी खेळाचे प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांसाठी चाचण्या
- डिजिटल कक्ष
- सेमी इंग्रजी माध्यम
1. संवाद पाक्षिक :- विद्यार्थ्यांवर लेखन संस्कार करून अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ
उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम! ‘संवाद’ हे पाक्षिक २००६ पासून १३
वर्षे दर पंधरा दिवसांनी प्रकाशित केले जाते.
2. हितैषी उपक्रम :- बुद्धिमापन चाचणीच्या निकालातील निष्कर्ष लक्षात घेऊन
मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्यांना
अविष्काराची संधी देत आत्मविश्वास मिळवून देणारा हितैषी उपक्रम, २००९ पासून
सतत १० वर्षे यशस्वीरित्या सुरु आहे.
3. क्षेत्रभेटी :- शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती
मिळविण्याचा अनुभव देण्यासाठी क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.
4. इयत्ता १०वीचा सातत्यपूर्ण १००% निकाल :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षेत विद्यालयाची सलग १७ वर्षे १००% निकालाची परंपरा आहे.
5. पर्यावरणपूरक सहशालेय उपक्रमांची रचना :- प्लास्टिकबंदी पथनाट्य,
शाडूमातीच्या गणेशमूर्ती, कागदी पिशव्यांचे वाटप, वृक्षदिंडी, नागपंचमी, अवकाश
निरीक्षण, वृक्षरक्षाबंधन, प्रदूषणविरहीत दिवाळी यासारख्या पर्यावरणस्नेही
उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
6. ज्ञानदायी विषय कोपरे :- शालेय इमारतीमधील सर्व कोपरे विविध विषयांमधील
मुलभूत संबोध, सूत्रे, व्याख्या यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनातून साकारले आहेत.
7. वर्गतुकड्यांचे वैशिष्ट्यपूर्ण नामकरण :- अ–अभ्यासू, ब–बरा, क–कच्चा नकोच!
वर्गतुकड्यांना फुलांची, पर्वतांची, थोर महापुरुषांची प्रेरणादायी नावे देण्याच्या
अभिनव कल्पनेमुळे शालेय वातावरण आनंददायी झाले आहे.
For STD 1st – 7th
Contact Person: Sheetal Salunkhe
Contact No. 9029401826
For STD 1st – 7th
Contact Person: Vidya Ruke
Contact No. 9867151272
For STD 8th – 10th
Contact Person: Manisha Mahajan
Contact No. 9029423600