MES Sou Vimlabai Garware High School, Junior College, Pune
Prabhat Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
Established in 1976
|
|
वृक्षारोपण
शनिवार दि.२.७.२०१६ रोजी प्रशालेतील एन सी सी मधील २१ छात्रानी व शिक्षकांनी पौड नानेगाव येथे शेतामध्ये व बांधावरती वृक्षारोपण केले. वृक्षांचे महत्व पर्यावरण विषय जनजागृती वृक्षसंवर्धन करणे हि काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून अतिशय उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री.दराडे सर यांनी केले.तसेच सहकारी शिक्षक श्री.जायभाय सर व हिले यांनी मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापन
दि.२०.७.२०१६ रोजी प्रशालेत डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन व पुणे मनपा अग्निशमन केंद्र व प्रशाला यांचे तर्फे प्रशालेत दुपार विभागात अग्निशामक दलातर्फे आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच फायर ब्रिगेड च्या जवानांनी पाण्याचे विविध प्रकारचे फवारे उडवून विद्यार्थ्यांची मने जिंकली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख श्री.दराडे सर यांनी नियोजन केले. सहकारी शिक्षिका श्रीम.सुवर्णा काळे व श्रीम.अनघा बोत्रे यांनी मार्गदर्शन केले.
आपली सूर्यमाला
इ.८ वी शिवनेरी व इ.८ वी तोरणा या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली सूर्यमाला हा कृती उपक्रम दि. २६.७.२०१६ रोजी सादर केला.यामध्ये सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ८ ग्रह यांनी समोर येऊन आपापली माहिती सांगितली व नंतर आपल्या कक्षेत जाऊन उभे राहिले व त्यानंतर सर्व ग्रह स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरताना दाखविले. या कृतीसाठी श्रीम.सुवर्णा काळे व श्रीम.उषा बगाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.काजरेकर मडम यांच्या प्रोत्साहनामुळे हि कृती अतिशय सुंदर रित्या सदर केली गेली.
ग्रंथ प्रदर्शन
दरवर्षी आमच्या प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन भरविले जाते.या प्रदर्शनात दरवर्षी ग्रंथालयातील एका विषयाची पुस्तके मांडलीजातात. तसेच त्या विषयाला अनुसरून चार्टस मुलांचे प्रोजेक्टही मांडले जातात. यावर्षी हे प्रदर्शन दि.२७ जुलै ते २ ऑगस्त २०१६ या कालावधीत भरविले गेले. यावर्षी भूगोल या विषयाची पुस्तके चार्टस व मुलांनी केलेली मोडेल्स प्रदर्शात मांडली होती. तसेच ऑस्ट्रेलिया इटली व जर्मनी या विषयाची पीपीटी इ.८ वी च्या मुलींनी तयार केली होती. ती प्रोजेक्टर वर दाखवून अबोली साने इ.८ वी शिवनेरी हिने माहिती सांगितली. तसेच या वर्गाने सूर्यमाला तयार केली होती.त्याबद्दलही माहिती सांगितली होती.विद्यार्थी व शिक्षकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला प्रतिसाद दिला.
For details, please contact - +91 020 25434326 / hm.vghs@mespune.in
Academic Year | SSC | Std 12 Science | Std 12 Commerce |
---|---|---|---|
2013 - 2014 | 99.04% | 94.48% | 91.2% |
2014 - 2015 | 99.0% | 99.5% | 100% |
2015 - 2016 | 90.91% | 91% | 100% |