MES Dnyan Mandir Pre-Primary School, Kalamboli

MES Dnyan Mandir, Kalamboli (Poorva-Prathamik)

Sector No 14, Kalamboli, Navi Mumbai (New Mumbai), India
Established in 1996

Medium - Marathi and English

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे संगोपन करतांना समाजातील सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना ‘सन १८६० मध्ये झाली. भारतातील जबाबदार देशभक्तीपर नागरिक बनविण्यासाठी सातत्याने १५९ वर्ष कार्यरत असणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था. या संस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ७७ शाखांमध्येच कळंबोली येथील म.ए.सो. ज्ञानमंदिर या शाळेचा समावेश होतो.

दि. १ जुलै १९९७ रोजी शाळेची स्थापना झाली. म.ए.सो. चे त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल ढेकणे, श्री. पानसे सर, श्री. शुक्ल सर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका म्हणून सौ. माधवी मतलापूरकर यांनी सूत्रे हातात घेतली. म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेची स्थापना करून नवी मुंबई परिसरात म.ए.सो. ने मुहूर्तमेढ रोवली. २२ वर्षापूर्वी रोवलेल्या बीजाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. कळंबोली परिसरात मुल्याधिष्टीत उपक्रम राबविणारी शाळा असा नावलौकीक अल्पावधीतच शाळेने मिळविला.

Scroll to Top
Skip to content