मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) चे आहेत माजी विद्यार्थी
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS Chief) सदानंद दाते यांची आज (बुधवार, दि. २७ मार्च २०२४) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
नवीन नियुक्तीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सदानंद दाते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
सदानंद दाते हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आहेत. मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) मधून १९८२ साली ते इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
भारतीय पोलीस सेवेतील १९९० च्या तुकडीचे अधिकारी असललेल्या दाते यांनी मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. केंद्रातही सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी काम केले आहे.