MES Kalavardhini, Pune
Renuka Swaroop, Memorial Girls High School 1453/54 Sadashiv Peth, Pune Maharashtra - 411030
Established in
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. देशाच्या शैक्षणिक इतिहासात आपल्या विद्यार्थी वर्गाच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमापासून आयुर्वेद महाविद्यालयापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७५ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांची शारीरिक संपत्ती जोपासण्यासाठी ‘मएसोक्रीडावर्धिनी’ कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचे मार्गदर्शन ‘मएसो क्रीडावर्धिनी’ करते. खासगी प्राथमिक मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मएसो क्रीडावर्धिनी’ च्या माध्यमातून सन २०१० पासून ‘मएसो करंडक’ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. स्वतंत्र जागा असलेली आधुनिक रायफल आणि पिस्तुल शुटींगरेंज हे ‘मएसो’चे क्रीडा विषयक वेगळेपण आहे. ‘मएसो’चे क्रीडा क्षेत्रातील हे लक्षणीय योगदान आहे. व्यक्तिमत्त्वाच्या विकासात असलेले कलांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘मएसो कलावर्धिनी’त शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्व वयोगटातील व्यक्तींना शास्त्रीय गायन-वादन, अभिनय आदी विविध कलांचे प्रशिक्षण घेता येईल.
विविध कलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी... मएसो कलावर्धिनी
मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागल्या तरी मनुष्याची सृजनशीलता त्याला स्वस्थ बसू देत नाही. ‘कला’ ही अशी गोष्ट आहे जी मनुष्यप्राण्याला इतर प्राणिजीवांपासून वेगळं करते, त्याची उन्नती करते.
गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प आणि साहित्य ह्या सर्व ललितकलांचे प्रयोजन एकच आहे ते म्हणजे, आत्माविष्कार आणि सौंदर्यनिर्मिती! कुठल्याही संपत्तीने विकत घेता येणार नाही आणि संपत्तीमध्ये ज्याचे मोजमाप करता येणार नाही असा निखळ, आत्मिक आनंद आपल्याला कलेच्या उपासनेतून मिळतो.एवढेच नव्हे तर दुर्धर आजारही संगीतोपचाराने बरे झाल्याची उदाहरणे आहेत.
जीवनामध्ये तणाव जाणवत असेल तेव्हाी संगीतचा आधायर घेतल्याोस मनुष्यावचा ताण कमी होतो. त्याहला प्रसन्नत वाटायला लागते.संगीतामुळे त्यावच्या् जीवनाला नवा आशय, नवा विषय मिळाला आहे. अशा या संगीताचे संस्कार बालपणीच झाले तर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम व्यक्तिमत्वावर होतो. बालपणी सर्वांच्याच भावनांची तीव्रता अधिक असते. त्यामुळे बालवयात जर संगीताचे संस्कार झाले तर मानवी भाव-भावनांतचे संतुलन राखण्यास मदत होते. शालेय जीवनात संगीत, अभिनय यांचे प्रशिक्षण घेण्याचे अनेक फायदे होतात; जसे की, संगीताच्या शिक्षणामुळे स्वतंत्र विचार करण्याची सवय लागते, समूहगीतातून सांघिक भावना वाढीस लागते, स्पष्ट शब्दोच्चाराची सवय लागते, निरीक्षण व अनुकरणातून कल्पकतेचा विकास होतो, देहबोलीचे सामर्थ्य व त्याचा प्रभाव यांची जाण निर्माण होते, गुणग्राहकता व दाद देण्याची मनोवृत्ती तयार होते इत्यादी.
अशा या कलेची साधना करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ अभिनयाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी एक विशिष्ट रीत आहे. त्यादृष्टीने ओंकार उच्चारणाचे विविध प्रकार, श्वसनाचे व्यायाम, शब्दोच्चारण, गद्य व पद्य वाचन अशा क्रमाने आवाजाची साधना, सर्जनात्मक विचारपद्धती, रंगमंचावरील हालचाली/वावर, सादरीकरणाची कौशल्ये, स्वतःच्या विचारातून त्यात नावीन्य आणणे आणि अंतिम सादरीकरण यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.
त्यामुळेच विविध कलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्व वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. कला क्षेत्रातील उत्तमोत्तम दिग्गज येथे मार्गदर्शन करतील.
‘मएसो कलावर्धिनी’च्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घ्या आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवा!