MES Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalay, Panvel (Poorva-Prathamik School)

Plot No. 113, Sector 06, New Panvel 410 206
Established on 21 June 1999

Medium - Marathi

२१ जून १९९९ रोजी म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना झाली. साध्य-साधन विवेक हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संस्कार हेच उत्तम जीवनमूल्य आहे. याच धोरणातून विद्यालयात संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन केले जाते. समृद्ध ग्रंथसंपदा हे शाळेचे वैभव आहे, विविध विषयांवरील सुमारे ४५०० पुस्तके शाळेतील ग्रंथालयात आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह यांसारख्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. तसेच विद्यालयात 'मिनी सायन्स सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे.

विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. बदलत्या शिक्षण प्रणालीत पालकांचा शाळेशी संपर्क असणे ही महत्त्वाची बाब असल्याने हे उपक्रम घेतले जातात.

Scroll to Top
Skip to content