(छायाचित्रात डावीकडून) – राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, नाशिकच्या महापौर रंजनाताई भानसी, राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे उप-प्राचार्य अनंत कुलकर्णी, प्राचार्या पूजा जोग आणि शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘आदिवासी सेवा संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला मिळाला आहे. रु. 50,001/- चा धनादेश, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ सन 2015-16 आणि सन 2016-17 या वर्षांसाठी शाळेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नाशिक येथील कालिदास कलामंदिरात सोमवार, दि.27 मार्च 2017 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. विष्णु सवरा यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. शाळेच्या वतीने शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर, प्राचार्या पूजा जोग आणि उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री.विष्णु सवरा हे होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्री.दादाजी भुसे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मा. मनिषा वर्मा तसेच नाशिकच्या महापौर मा. रंजनाताई भानसी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 16 व्यक्ती आणि 7 संस्थाना ‘आदिवासी सेवक’ आणि ‘आदिवासी सेवा संस्था’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Scroll to Top
Skip to content