
MES Poorva-Prathamik Shala, Pune
1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 18 June 1979
Medium - Marathi
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक शाळा ही १८ जून १९७९ रोजी स्थापन झालेली असून, गेली ४६ वर्षे बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. प्रशस्त इमारत, सुरक्षित अंगण, CCTV सुरक्षा व्यवस्था आणि NEP 2020 आधारित अभ्यासक्रम ही शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
अनुभवी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना ई-लर्निंग, Spoken English, संगीत, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा, क्रीडा उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली तसेच पालक-समुपदेशन कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
संस्कारक्षम, शिस्तबद्ध व विद्यार्थीकेंद्रित वातावरणात शिक्षण देऊन प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हे शाळेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
✓ शैक्षणिक वैशिष्ट्ये
| ✓ विशेष उपक्रम
|
✓ विकास व संस्कार
| ✓ पालक सहभाग
|
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी समाजसुधारकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आजी-आजोबा मेळावा, आनंददायी शनिवार, जीवनव्यवहार उपक्रम आणि वार्षिक सहल यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, सर्जनशीलता आणि सामाजिक कौशल्यांचा विकास घडविण्यात आला.
सांस्कृतिक उपक्रमांत पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, शक्ती स्तुती तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन, मूल्यशिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
क्रीडा सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड, संघभावना आणि क्रीडासंस्कार विकसित करण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धा, योगप्रकार आणि पालकांसाठीही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच वर्षभरातील विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना “विद्यासंस्कार पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वय वर्षेपूर्ण असणाऱ्या मुलांसाठी
• ३ वर्षेपूर्ण - खेळवाडी गट
• ४ वर्षेपूर्ण – लिान गट
• ५ वर्षेपूर्ण – मोठा गट
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
• मुलाच्या जन्मदाखल्याची झेरोक्स
• मुलाच्या आधारकाडणची झेरोक्स
Online प्रवेशासाठी संपर्कसाठी
• https://mespunp.ethdigitalcampus.com/DCWeb/form/jsp_aaa/OnlineAdmissio
nDashboard.jsp?dbConnVar=MESPUNP&portalFlag=adm
+91 020 24482557
+91 83083 45209
hm.ppsp@mesune.in
https://www.fb.com/purvprathmikschool
https://preprimary.mespune.in//
Google Map
