
MES College Of Nursing, Lote - Ghanekhunt (Chiplun)
Mumbai-Goa Highway, Opp. Lote MIDC, Ghanekhunt, Tal - Khed, Dist - Ratnagiri - 415722
Established in 27 July 2009
एम ई एस कॉलेज ऑफ नर्सिंग हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एक नामांकित नर्सिंग शिक्षण संस्थान असून रत्नागिरी जिल्ह्यातील घाणेखुंट-लोटे, ता. खेड येथे स्थित आहे. महाविद्यालयाची स्थापना दिनांक २७ जुलै २००९ रोजी करण्यात आली. हे महाविद्याल Maharashtra University of Health Sciences संलग्न असून Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे.
महाविद्यालयामध्ये ए.एन.एम. (ANM), जी.एन. एम. (GNM), बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग तसेच एम.एस्सी. नर्सिंग असे पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयाची एकूण वार्षिक प्रवेश क्षमता १६५ विद्यार्थ्यांची असून आजपर्यंत १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण पूर्ण केले आहे. संस्थेचे विद्यार्थी भारतातील तसेच परदेशातील विविध नामांकित रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
महाविद्यालयाचा परिसर सुमारे १३.५ एकर क्षेत्रात पसरलेला असून अत्याधुनिक व प्रतिष्ठित नर्सिंग प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, सुसज्ज ग्रंथालय, संगणक विभाग, वसतिगृह, क्रीडा सुविधा,सभागृह तसेच क्लिनिकल प्रशिक्षणासाठी संलग्न रुग्णालय उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संशोधन, व्यक्तिमत्त्व विकास, समुदाय आरोग्य सेवा व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले जाते. महाविद्यालयास National Assessment and Accreditation Council कडून NAAC “B+” मानांकन प्राप्त झाले असून संस्था गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण, सेवा व संशोधन क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. महाविद्यालयाचे ध्येय “सेवा, शिक्षण आणि संशोधन” या त्रिसूत्रीवर आधारित असून ग्रामीण व कोकण परिसरात कुशल, संवेदनशील व व्यावसायिक नर्सिंग मनुष्यबळ निर्माण करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
1. अत्याधुनिक व सुसज्ज नर्सिंग प्रयोगशाळा (Nursing Skill Laboratories)
2. डिजिटल लायब्ररी, ई-लर्निंग सुविधा व अद्ययावत ग्रंथालय
3. स्मार्ट क्लासरूम व ICT आधारित अध्यापन पद्धती
4. अनुभवी, प्रशिक्षित व पात्र प्राध्यापक वर्ग
5. संलग्न बहुविशेषता रुग्णालयामध्ये उत्कृष्ट क्लिनिकल प्रशिक्षण सुविधा
6. संगणक प्रयोगशाळा व इंटरनेट सुविधा
7. विद्यार्थिनींसाठी २४ x ७ सुरक्षा असलेले सुसज्ज वसतिगृह
8. अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची सुविध9. विद्यार्थ्यांसाठी “कमवा व शिका” योजना उपलब्ध
10. विविध शासकीय व खासगी शिष्यवृत्ती योजनांची पूर्ण सुविधा
11. व्यावसायिक समुपदेशक (Professional Counsellor) द्वारे विद्यार्थी समुपदेशन (Student Counselling) सुविधा
12. स्टुडंट नर्सेस असोसिएशन (SNA) मार्फत नेतृत्व व व्यावसायिक विकास उपक्रम
13. एम. ई. एस. नर्सिंग कॉलेज रोटरॅक्ट क्लबद्वारे सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम
14. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मार्फत विद्यार्थ्यांकडून सामाजिक सेवा व जनजागृती उपक्रम
15. ग्रामीण व शहरी भागामध्ये नियमित आरोग्य शिबिरे, आरोग्य सर्वेक्षण व जनजागृती कार्यक्रम
16. संशोधन प्रोत्साहन, कार्यशाळा, परिषद व वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन
17. व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य व सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यक्रम
18. करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सहाय्य सुविधा
19. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रम
20. महिला सुरक्षेसाठी Internal Complaint Committee (ICC) कार्यरत
21. Anti-Ragging Committee, Student Welfare Committee व Mentorship System कार्यरत
22. Infection Control Practices व Basic Life Support (BLS) प्रशिक्षण सुविधा
23. पर्यावरणपूरक, हिरवागार व शांत शैक्षणिक परिसर
24. NAAC “B+” मानांकन प्राप्त संस्था
25. १२०० पेक्षा अधिक प्रशिक्षित विद्यार्थी भारत व परदेशात कार्यरत
26. वार्षिक १६५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले प्रगत नर्सिंग शिक्षण केंद्र
सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक उपक्रम
शैक्षणिक उपक्रम
- नवागत विद्यार्थ्यांसाठी Orientation Programme
- तज्ञ व्यक्तींची व्याख्याने व Guest Lecture Series
- कार्यशाळा, सेमिनार व Continuing Nursing Education (CNE) कार्यक्रम
- संशोधनविषयक प्रशिक्षण, Systematic Review व Meta-analysis राष्ट्रीय कार्यशाळा
- क्लिनिकल कौशल्य विकास प्रशिक्षण व Simulation आधारित अध्यापन
- Basic Life Support (BLS) व Infection Control Training
- डिजिटल शिक्षण व ई-लर्निंग उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी Study Skills व Time Management मार्गदर्शन
- करिअर मार्गदर्शन व उच्च शिक्षणविषयक सत्रे
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनांचे शैक्षणिक आयोजन
- आरोग्य जनजागृती कार्यक्रम व समुदाय आरोग्य उपक्रम
- पोस्टर, पेपर व वैज्ञानिक सादरीकरण स्पर्धा
- IQAC अंतर्गत गुणवत्ता वृद्धी उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मेंटरशिप कार्यक्रम
सांस्कृतिक उपक्रम
- Fresher’s Welcome Programme
- शिक्षक दिन, नर्सेस डे व पारंपरिक दिवस साजरा
- वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव
- नृत्य, गायन, नाट्य व कला स्पर्धा
- पारंपरिक वेशभूषा व लोककला कार्यक्रम
- रोटरॅक्ट क्लब व SNA मार्फत सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम
- राष्ट्रीय सण व महापुरुष जयंती कार्यक्रम
- व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व विकास उपक्रम
- NSS मार्फत सामाजिक सेवा व जनजागृती अभियान
क्रीडा उपक्रम
- वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन
- कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट व बॅडमिंटन स्पर्धा
- योग व फिटनेस उपक्रम
- Indoor Games – Chess, Carrom, Table Tennis स्पर्धा
- विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व तंदुरुस्ती अभियान
- आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग
- Sports Day व Fitness Awareness Programme
- विद्यार्थ्यांमध्ये संघभावना व नेतृत्वगुण विकासासाठी क्रीडा उपक्रम
प्रवेश – प्रवेश प्रक्रिया व आवश्यक माहिती
- महाविद्यालयामध्ये ANM, GNM, B.Sc. Nursing, Post Basic B.Sc. Nursing व M.Sc. Nursing अभ्यासक्रमांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत.
- सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया साधारणतः मे – जून महिन्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होते
अभ्यासक्रमनिहाय पात्रता व प्रवेश क्षमता
ANM (Auxiliary Nurse Midwifery)
कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण आवश्यक
किमान ४०% गुण आवश्यक
राखीव प्रवर्गासाठी ५% गुण सवलत लागू
प्रवेश क्षमता : ३०
GNM (General Nursing and Midwifery)
१२ वी उत्तीर्ण आवश्यक
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य
किमान ४५% गुण आवश्यक
राखीव प्रवर्गासाठी ५% गुण सवलत लागू
प्रवेश क्षमता : ४०
B.Sc. Nursing
प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या CET Cell मार्फत राबविण्यात येते
MH Nursing CET पात्रता आवश्यक
PCB (Physics, Chemistry, Biology) गटामध्ये किमान ४५% गुण आवश्यक
शासन नियमानुसार राखीव प्रवर्गास सवलत लागू
प्रवेश क्षमता : ५०
Post Basic B.Sc. Nursing (P.B.B.Sc.)GNM अभ्यासक्रम किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक
Maharashtra Nursing Council / Indian Nursing Council नोंदणी (Registration) आवश्यक
प्रवेश क्षमता : २०
M.Sc. Nursing
B.Sc. Nursing अथवा P.B.B.Sc. Nursing किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक
Nursing Council Registration आवश्यक
नोंदणीनंतर किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक
प्रवेश क्षमता : २५
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१० वी व १२ वी गुणपत्रिका
Leaving Certificate
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
उत्पन्न प्रमाणपत्र
आधार कार्ड प्रत
पासपोर्ट आकाराचे फोटो
domicile / nationality प्रमाणपत्र
जातीचा दाखला
जात पडताळणी
नॉन क्रिमीलेअर
Migration Certificate (लागू असल्यास)
Nursing Council Registration Certificate (लागू अभ्यासक्रमासाठी)
अनुभव प्रमाणपत्र (M.Sc. Nursing साठी)
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा
शासनमान्य शिष्यवृत्ती योजना
“कमवा व शिका” योजना
सुरक्षित व सुसज्ज विद्यार्थिनी वसतिगृह
डिजिटल लायब्ररी व आधुनिक प्रयोगशाळा
व्यावसायिक समुपदेशन सुविधा
शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम
अधिक माहितीसाठी :
MES College of Nursing Official Website: nursingcollege.mespune.in
पत्ता : Ghanekhunt-Lote
ई-मेल : mesnursing@mespune.in
संपर्क : महाविद्यालय कार्यालय, फोन न. ०२३५६ ६६१५७९
मागील वर्षांचे निकाल व यश
MES College of Nursing, घाणेखुंट-लोटे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत चालणारे आणि Maharashtra University of Health Sciences, Indian Nursing Council, New Delhi, Maharashtra Nursing Council, Maharashtra State Board of Nursing & Paramedical Education संलग्न नामांकित नर्सिंग महाविद्यालय आहे. महाविद्यालय सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता,
क्लिनिकल कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी ओळखले जाते.
शैक्षणिक यश
महाविद्यालयाचा वार्षिक निकाल दर अत्यंत समाधानकारक असून बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण दर उच्च आहे (१००%).
विविध वर्षांमध्ये विद्यापीठ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
B.Sc. Nursing, M. Sc. Nursing व P.B.B.Sc. Nursing या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर चांगले गुण मिळवले आहेत.
प्लेसमेंट व रोजगार यश MES College of Nursing, घाणेखुंट-लोटे येथे विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी सक्रिय Training & Placement Cell कार्यरत असून नियमितपणे Campus Interview चे आयोजन केले जाते.
Placement Cell मार्फत नामांकित रुग्णालये व आरोग्य संस्थांद्वारे Campus Interviews आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांना Pre-Placement Training, Mock Interview, Resume Writing व Communication Skills Training दिले जाते.
Campus Interview मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे गुणवत्ता, कौशल्य व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षानंतर विविध हॉस्पिटल्स व हेल्थकेअर संस्थांमध्ये रोजगार संधी मिळतात.
महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतातील तसेच परदेशातील नामांकित रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत.
एकूणच Placement Cell च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात.
महाविद्यालयाचे ध्येय विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे तर रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे यशस्वी करिअर घडवणे हे आहे.
एकूण यश व योगदान आजपर्यंत १२०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करून भारतात व परदेशात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
ग्रामीण कोकण भागातील आरोग्यसेवेत योगदान देणारे कुशल नर्सिंग मनुष्यबळ निर्माण करण्यात महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.
शैक्षणिक, सांस्कृतिक व क्लिनिकल क्षेत्रातील सर्वांगीण विकासामुळे विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दर्जा उंचावला आहे.
संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी NAAC “B+” मानांकन प्राप्त संस्थाअत्याधुनिक नर्सिंग प्रयोगशाळा व डिजिटल लायब्ररी क्लिनिकल ट्रेनिंगसाठी मजबूत हॉस्पिटल संलग्नता विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक विकास एकूणच, MES College of Nursing हे गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण, चांगला निकाल आणि यशस्वी करिअर घडविणारे एक प्रगत प्रशिक्षण केंद्र आहे.
For details, please contact - https://nursingcollege.mespune.in/academics/courses/
