
MES Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalay, Panvel (Poorva-Prathamik School)
Plot No. 113, Sector 06, New Panvel 410 206
Established on 21 June 1999
Medium - Marathi
२१ जून १९९९ रोजी म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना झाली. साध्य-साधन विवेक हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संस्कार हेच उत्तम जीवनमूल्य आहे. याच धोरणातून विद्यालयात संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन केले जाते. समृद्ध ग्रंथसंपदा हे शाळेचे वैभव आहे, विविध विषयांवरील सुमारे ४५०० पुस्तके शाळेतील ग्रंथालयात आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह यांसारख्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. तसेच विद्यालयात 'मिनी सायन्स सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे.
विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. बदलत्या शिक्षण प्रणालीत पालकांचा शाळेशी संपर्क असणे ही महत्त्वाची बाब असल्याने हे उपक्रम घेतले जातात.
* अनुभवी व प्रेमळ शिक्षकवर्ग
* सुरक्षित व आकर्षक वर्गखोल्या
* खेळातून शिक्षण
* कृतीआधारित अध्यापन
* बालगीत, गोष्टीकथन, चित्रकला व इतर मनोरंजक उपक्रम
* सुरक्षित शालेय परिसर
* स्मार्ट शिक्षण वातावरण
* प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
* सण व विशेष दिवसांचे उत्साहात आयोजन
* बनी टमटोला
* शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट
- बनी टमटोला उपक्रम – खेळवाडी ते मोठा शिशु (३ ते ६ वर्षे) विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, संवादात्मक व कृतीआधारित शिक्षणासाठी आयोजित.
- क्षेत्रभेटी – अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक क्षेत्रभेटींद्वारे प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभवाधारित शिक्षण व ज्ञानवृद्धी.
- पर्यावरणपूरक व सहशैक्षणिक उपक्रम
- पानांपासून गणपती बनविणे
- गोगलगाय दोरा ओवणे उपक्रम
- स्वच्छता उपक्रम
- दहीहंडी उत्सव
- नागपंचमी साजरी करणे
- पावसाळी प्रकल्प
- रक्षाबंधन उत्सव
- प्रदूषणमुक्त दिवाळी
- मराठी राजभाषा दिन
- विविध पर्यावरणपूरक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
- पालक स्पर्धा व उपक्रम
- मोदक बनविणे स्पर्धा
- शैक्षणिक साहित्य निर्मिती
- “पालक शिक्षक” उपक्रम
- पालकांसाठी शाळा कार्यक्रम
- विविध पालक-शाळा सत्रांचे आयोजन
- सहभागी विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे प्रदान
- मुक्तांगण मासिक
- विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन
- विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, कलात्मक व शैक्षणिक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ
- शालेय मासिक “मुक्तांगण” चे नियमित प्रकाशन.
प्रिय पालकहो,
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी पूर्व-प्राथमिक मराठी माध्यम विभागात प्रवेश सुरू आहेत.
उपलब्ध वर्ग :
खेळवाडी
छोटा शिशू
मोठा शिशू
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण व जिव्हाळ्याचे वातावरण देण्यास आम्ही कटिबद्ध
आहोत.
प्रवेशासाठी संपर्क :
९२२१० ४९६९२
७७७६९१४७६७
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा!

