गोविंद दि. कुलकर्णी यांची शिक्षण तज्ञ म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर शिक्षण तज्ञ म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील गोविंद दि. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) मधील शिक्षक अनिल म्हस्के यांची मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अलिकडेच या दोन्ही नियुक्त्या केल्या आहेत.