अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांची मानवी साखळी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आज (शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट २०१९) महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली.

या वेळी ‘मएसो’चे नियामक मंडळ सदस्य मा. विजय भालेराव, साहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पी.बी. बुचडे, उपप्राचार्य डॉ. अंकूर पटवर्धन, उपप्राचार्य डॉ.सुनीता भागवत, उपप्राचार्य श्रीमती शैला त्रिभुवन,पर्यवेक्षक श्रीमती स्मिता कुलकर्णी, डॉ. अतुल कुलकर्णी, श्री. सुधीर भोसले, श्री. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.